कृषी पर्यटन केंद्र : वृक्षवल्ली

                     कृषी पर्यटन केंद्र : वृक्षवल्ली

 कोकण म्हणजे पर्यटकांचे लक्ष वेधून घेणार हक्काने त्यांना बोलावणार डेस्टिनेशन. कोकणची वृक्षवल्ली व निसर्ग यांच्या प्रेमात पर्यटक असतात...

शहरी धकाधकीच्या जीवनात कंटाळलेल्या असंख्य पर्यटकांसाठी वृक्षवल्ली म्हणजे नवसंजीवनच.

निसर्गाचा मनमुराद आनंद व तोही शहरी सुख सोयींचा अनुभव देऊन हे हि वृक्षवल्लीने शक्य केलय.

पर्यटनाबरोबरच ग्रामीण जीवन , शेती संस्कृती , घरगुती पध्दतीचे तसेच चुलीवरील जेवण , कोकणी व मालवणी जेवणाचा आस्वाद पर्यटकांना घेता येतो.

पर्यटकांना राहण्यासाठी स्वतंत्र रूम्स व डोरमेट्री आहे. त्याचबरोबर आधुनिक सुविधा म्हणजे फ्री वाय/ फाय देखील आहे.  पर्यटकांच्या करमणुकीसाठी जंगल सफारी , रैनडान्स, वाॅटरफाॅल पूल, इंडोर व आउटडोर गेम्स , अॅस्ट्रोनाॅमिकल टेलीस्कोप, अॅम्युजमेंट पार्क, संगीत , तसेच लॉन , मल्टीपरपोज हॉल, शेती उप्तादने देखील आहेत.

शहरी भागात बघायला न मिळनारे प्राणी,पक्षी,फळे,फुले या ठिकाणी बघण्याची संधी मिळते. लहान मुलांसाठी विविध प्रकारची खेळणी देखील आहेत. त्यामुळे संपुर्ण दिवस लहान मुलांना याचा आनंद घेता येतो. अॅस्ट्रोनाॅमिकल टेलीस्कोपने आपण अंतराळातील तारे व ग्रह बघू शकतो. हे एक वृक्षवल्लीचे वैशिष्ट्य आहे. लग्नासाठी व वाढदिवस साजरा करण्यासाठी स्वतंत्र लॉन व स्टेजची सुविधा आहे.

परशुराम,गुहागर,डेरवण,हेदवी तसेच इतर पर्यटनस्थळे या कृषी पर्यटनापासून काही अंतरावरवरच असल्याने पर्यटकांना सोयीचे ठरते.

विसाव्याचे शांत ठिकाण म्हणून देखील पर्यटकांनी वृक्षवल्लीला पसंती दिलेली आहे.

 सर्वांनी आवर्जून एकदातरी भेट द्यावी व भेट देणाऱ्यांनी पुन्हा पुन्हा भेट द्यायला हवीच! असे वाटणारे चिपळूण शहरापासून  ८ किमी अंतरावर असणारे गुहागर रोडवरील वृक्षवल्ली हे कृषी पर्यटन केंद्र आहे.

हे सर्वांच्या जिव्हाळ्याचे केंद्र बनत आहे हे निश्चितच! 


पत्ता : अट.पोस्ट रेहेल कान्हेरेवाडी, चिपळूण गुहागर हायवे, तालुका: चिपळूण,  जिल्हा: रत्नागिरी 415605


Comments

Popular posts from this blog

R.K. Builders and developers chiplun

vrukshavalli agro tourism chiplun

Vrukshavalli Agro Tourism Chiplun