निलेश प्रथमतः ‘विळखा’
निलेश प्रथमतः ‘विळखा’
दिग्दर्शक म्हणून सुरुवात कशी झाली?
धन्यवाद हर्षद.
लहानपणापासून फिल्म आणि चित्रपट याची खूप आवड होतीच पण या क्षेत्राची इतकी माहिती नव्हती. त्यासाठी २००८ ला आम्ही ‘वळणावरती’ या लघुपटाची निर्मिती केली. पहिल्याच प्रोजेक्ट मध्ये संजय खापरे सारखे अनुभवी कलाकार आम्हाला लाभले. तो लघुपट करताना आलेला अनुभव खूप काही देऊन गेला. आपण एखादा चित्रपट पाहतो आवडला नाही तर नाव ठेवून मोकळे होतो पण प्रत्येक कलाकृती मागे किती लोकांचे कष्ट असतात, त्यामागे किती मेहेनत असते याचा प्रत्यय आला. त्यानंतर आत्तापर्यंत आलेल्या सर्व चांगल्या वाईट सिनेमातल्या फक्त चांगल्या आणि शिकण्यासारख्या गोष्टी बघतो आणि लक्षात ठेवतो.

‘वळणावरती’ मध्ये कथा हा माझी आणि माझ्या सहकार्यांची होती दिग्दर्शक आमचे मित्र होते. त्यावेळी एक नवीन टीम तयार झाली ज्याची आज चित्रपट बनवताना सर्वात मोठी गरज असते. तुमच्याकडे चांगली टीम असेल तर तुमचे काम सोपे होते. २०१२ रोजी आम्ही वननेस फिल्म्स या नावाने प्रॉडक्शन सुरू केले आणि ‘भ्रम’ नावाचा पहिला लघुपट केला. दिग्दर्शक म्हणून माझा हा पहिला लघुपट. त्यात माझा शाळेतला मित्र अमृत अमरनाथ हा निर्माता म्हणून माझ्या पाठीशी उभा राहिला. लघुपट बनवताना तुमच्याकडे विषय असतो, कलाकार आणि इतर सर्व गोष्टी तुम्हाला सहज उपलब्ध होऊ शकतात पण त्यासाठी लागणारा निर्माता सर्वात महत्वाचा असतो. कारण लघुपटातून आर्थिक फायदा होईलच याची शाश्वती नसते.
Comments
Post a Comment