vrukshavalli
शहरी भागात बघायला न मिळनारे प्राणी,पक्षी,फळे,फुले या ठिकाणी बघण्याची संधी मिळते. लहान मुलांसाठी विविध प्रकारची खेळणी देखील आहेत. त्यामुळे संपुर्ण दिवस लहान मुलांना याचा आनंद घेता येतो. अॅस्ट्रोनाॅमिकल टेलीस्कोपने आपण अंतराळातील तारे व ग्रह बघू शकतो. हे एक वृक्षवल्लीचे वैशिष्ट्य आहे. लग्नासाठी व वाढदिवस साजरा करण्यासाठी स्वतंत्र लॉन व स्टेजची सुविधा आहे.
परशुराम,गुहागर,डेरवण,हेदवी तसेच इतर पर्यटनस्थळे या कृषी पर्यटनापासून काही अंतरावरवरच असल्याने पर्यटकांना सोयीचे ठरते.
विसाव्याचे शांत ठिकाण म्हणून देखील पर्यटकांनी वृक्षवल्लीला पसंती दिलेली आहे.
सर्वांनी आवर्जून एकदातरी भेट द्यावी व भेट देणाऱ्यांनी पुन्हा पुन्हा भेट द्यायला हवीच! असे वाटणारे चिपळूण शहरापासून ८ किमी अंतरावर असणारे गुहागर रोडवरील वृक्षवल्ली हे कृषी पर्यटन केंद्र आहे.
हे सर्वांच्या जिव्हाळ्याचे केंद्र बनत आहे हे निश्चितच!www.vrukshavalliresort.com
Comments
Post a Comment